Web    lonari.comइंटरनेटवर आणि कॉंप्युटरवर मराठी लिहीणं अतिशय सोप्पं असतं

इंटरनेटवर आणि कॉंप्युटरवर मराठी लिहीणं खुप सोप्पं असतं. त्यासाठी काही शिकायची वगैरे गरज नसते. नुसतं ghar लिहीलं ही घर होतं आणि paaNi लिहीलं की पाणी होतं. हे इतकं सोपं असतं . आणि त्यासाठी दुनियाभरची सोप्पी आणि फ़ुकट softwares आहेत. इंटरनेट वर लिहीण्यासाठी आहेत. इंटरनेट नसलं तरी इतर कशाही document वर लिहीण्यासाठी आहेत. ही डाऊनलोड करायला पैसे लागत नाहीत आणि वेळ दहा मिनिटांहून जास्त लागत नाही. शिकायला पाच मिनिटं. पंधरा मिनिटांत तुम्ही मराठी अगदी सहजपणे टाईप करू शकता.

पण तरीही असंख्य मराठी लोकांना आपल्या सख्ख्या भावाला सुद्धा मेल पाठवताना इंग्लीशमध्येच पाठवावी लागते. का ? लाज वाटते ? नाही. कारण त्यांना या softwares चा पत्ताच नसतो. जगात आता लाखों मराठी लोक कॉंप्युटर वापरतात. पण त्यांना त्यावर मराठी लिहीता येत नाही. लाज वाटते असं नाही. त्यांना ठाऊकच नसतं कसं लिहायचं ते. किंवा ते इतकं सोप्पं आहे याचा पत्ता नसतो.

अशा लोकांसाठी ही ई शाळा. पहिला धडा मराठी गुगलचा दिला आहे. अशाच आणखी अनेक प्रकारांची माहिती घेऊन ही ई शाळा येत आहे. एकदा फ़क्त प्रयत्न करून बघा. मग म्हणाल की “हात्तेच्या ! इतकं सोप्पंय होय ?”

या ई शाळेत सुरुवात जरी मराठी गमभन ने होईल तरी पुढे पुढे अनेक गंभीर विषयांवरची माहितीपुर्ण पुस्तकं येतीलच. आणि ती लिहीणार कोण. अरे… ! आपणच लिहा की. आपल्या आवडत्या विषयावरच्या ज्ञानाची देवाण घेवाण करूया. साहित्य, शास्त्र, संगीत, कला , रुची, वस्त्रं, आरोग्य कसलाही विषय घेऊन तुम्ही लिहू शकता. तुमचा विषय तुम्ही निवडा. पुस्तक आम्ही बनवू. आणि आम्ही ते लाखो लोकांपर्यंत नेऊ.

चला तर ! आता मराठीत लिहायची सुरूवात करा. लवकरच तुम्ही एक्स्पर्ट होणार आहात. या ई शाळेचे प्रवर्तक आहेत ई साहित्य प्रतिष्ठान. यांची अनेक ई पुस्तकं आहेत. विनोद, काव्य, वगैरेवर. तशीच ई मॅगझीन्सही आहेत. नेटाक्षरी, ई श्टाप, स्वर नेटाक्षरी वगैरे. ई साहित्य प्रतिष्ठानची इतर ई प्रकाशनं आणि ई नियतकालिकं विनामूल्य मिळण्यासाठी आम्हाला लिहा. हे पुस्तक आपल्या मित्र मैत्रिणींना फ़ॉरवर्ड करा. तसंच या ई शाळॆबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा. मराठी वापरण्यात काही अडचण वगैरे आली तर लिहा. या पुस्तकाच्या लेखिका भारती सरमळकर आपल्या शंकांचं निरसन करतील. आम्ही आहोतच आपल्या जोडीला.

अधिक माहितीसाठी ई-बुक डाऊनलोड करा