Meaning of Logo
लोणारी समाज संघटित व्हायचा असेल तर एक झेंडा आणि एक बोधचिन्हाची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने वरील बोधचिन्हाची निर्मिती केली आहे.
वरील बोधचिन्हाचा भावार्थ खालीलप्रमाणे देत आहे. तो लोणारी समाज बंधु - भगिनींनी समजावून घ्यावा आणि या बोधचिन्हाचा लोणारी समाजात प्रचार करावा. हि नम्र विनंती करीत आहे.
- वरील बोधचिन्हात प्रथम सूर्य दाखविला आहे म्हणजे आपण सूर्यवंशी आहोत.
- वरील बोधचिन्हात समुद्र (महासागर) दाखविलेला आहे म्हणजे आपले पूर्वज या समुद्राच्या खारट पाण्यापासून मीठ निर्मिती करीत असे. मीठ म्हणजे लोण. लोण या शब्दावरून लोणारी असे आपल्या समाजाचे नाव प्रचलित पडले.
- वरील बोधचिन्हात उजव्या बाजूला झाड दाखविलेले आहे म्हणजे जंगलात जाऊन झाडे तोडून त्यापासून कोळसा बनविण्याचा व्यवसाय आपले लोक करीत असे.
- वरील बोधचिन्हात डाव्या बाजूला चुनाभट्टी दाखविलेले आहे म्हणजे सध्या अस्तित्वात असलेला एकमेव धंदा म्हणजे चुन्याचा व्यवसाय होय असे एकंदरीत वरील बोधचिन्हावरून आपल्या समाजाची ओळख पटत आहे.
श्री. हरिभाऊ खंडेराव पाटसकर