Web    lonari.comNew लोणारी समाज सेवा संघ, मुंबई (२६ जानेवारी २०११)

बुधवार दि. २६ जानेवारी २०११ रोजी मुंबई लोणारी समाज सेवा संघाची वार्षिक सर्व साधारण सभा व श्री. सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली होती.

लोणारी समाजाचे पितामह, समाजरत्न कै. विष्णुपंत रामचंद्र लोणारी (दादरे) यांनी लोणारी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासामध्ये भरीव योगदान दिलेले आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे. आपल्यातुन त्यांना जावून एक वर्ष पूर्ण झालेले आहे. तरी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्याप्रमाणे सध्या कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील जेष्ठ लोणारी समाज सेवकास कै. विष्णुपंत रामचंद्र लोणारी (दादरे) स्मृती पुरस्कार देण्यात आला.

सन २०११ चे कै. विष्णुपंत रामचंद्र लोणारी (दादरे) पहिला स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यासाठी पुणे येथील थोर समाजसेवक, कळकळीचे कार्यकर्ते, आखिल लोणारी समाज सेवा संघ आणि पुणे लोणारी समाज शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टचे सचिव श्री. बाळकृष्ण रुंजाबा कानडे सर यांना देण्यात आला.

ह्या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती:
श्री. तुकाराम बजबळकर - पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
श्री. अनिल मुळेकर - अध्यक्ष्य, बीड जिल्हा लोणारी समाज
श्री. जयंत बजबळे - पोलीस उप अधिक्षक
श्री. श्रीराम बजबळे - सहाय्यक विक्रीकर आयुक्त, सोलापूर
प्राध्यापाक चंद्रकांत बबनराव गीते - संपादक, समाजरत्न विष्णुपंत लोणारी (दादरे)
श्री. काळेल गुरुजी - संपादक, गोत्र त्रैमासिक
श्री. कारंडे - अंग रक्षक, मा. ना. अजितदादा पवार