Web    lonari.comNew आम्ही लोणारी...

आम्ही लोणारी...

जात आमची लोणारी
घर दार आमचे डोंगर दरी
मीठ आमचं माय बाप
गाढव वाहती ओझ्याचा व्याप ||१||

पोटासाठी रोज बदलतो तळ
शासनदरबारी चालूच आहे छळ
सत्य आहे, कमी पडतं ते एकीच बळ
एकी म्हंटल कि अनेकांच्या पोटात येते कळ ||२||

बेकीचा घेतला सर्वांनी फायदा
भटके असूनही, आमच्यासाठी नाही कायदा
नोंद नाही शासन दरबारी
जात एक पण सतरा कारभारी ||३||

नको आता पुढे पाठ अन मागे सपाट
वळवू एकीची वज्रमुठ
घड्वायचीच असेल क्रांती
तर करावी लागेल महराष्ट्र भ्रमंती ||४||

कवी: विक्रमसिंह एकनाथ खिलारी
शेणवडी, तालुका माण, सातारा जिल्हा
७५०७२८८१४५, ९५९५४४६००६९