Web    lonari.com



New लोणारी - माझी प्रतिज्ञा

  • मी एक लोणारी समाजाचा जबाबदार समाजबांधव आहे.
  • लोणारी हा माझा जन्मदाता समाज आहे.
  • लोणारी समाजातील सर्वजण हे माझे समाजबांधव आहेत.
  • मला समाजाचा व समाज बांधवांचा सार्थ अभिमान व आदर आहे.
  • लोणारी समाजाने मला काहीतरी चांगले दिले आहे या भावनेने प्रेरित होऊन समाज सेवा दान करणे हे माझे परम कर्तव्य आहे.
  • मी माझ्या समाजातील सर्व बंधू भगिनींच्या विचारांचा व त्यांच्या परिस्थितीचा साकल्याने विचार करून त्यांच्याशी सौजन्याने वागेन.
  • माझी माझ्या समाजातील बालके, बंधू, भगिनींना आपुलकीच्या वातावरणात ठेऊन त्यांना धैय सत-सत विवेकबुद्धी, चौकस होण्यास आधापर प्रोत्साहन देईन.
  • मी माझ्या समाजासाठी अन्यायाविरुद्ध लढून न्यायदानासाठी कसोशीने प्रयत्न करीन. एकासाठी सर्व व सर्वांसाठी एक हा लोकशाही प्रबोधनाचा संदेश माझ्या लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्ष्यात उतरविण्यासाठी निष्ठेने पुढाकाराने प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने पार पाडण्यासाठी प्रतिज्ञा करित आहे.
  • मी व माझ्या जबाबदार बांधवांनी माझ्या समाजातील सर्व जनतेला सर्वोत्तेपरी सहकार्य केल्याने माझ्या बांधवाना, लोणारी समाजाचा तथा राष्ट्राचा समृद्धी विकास साकार होणार आहे. या माझ्या शपथ पूर्ण जाणिवेतच माझे सौख्य सामावले आहे.

- श्री. दादा बाड, लक्ष्मिनगर
तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर
९८२२६०६५७६