Web    lonari.com



आपल्यासाठी आपली माणसे



समाज्याला उभारी घेण्यासाठी कशाची गरज आहे तर ती आहे शिक्षण, संघटन आणि सत्ता आणि या सर्वात महत्वाची आहे ती सत्ता. कारण सत्ता जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत समाज्याला शिक्षित किंवा संघटीत असूनही पिछाडीवर रहाव लागत.

मुठभर सत्तेत असलेले राजकारणी त्यांच्या माणसांना सांभाळतात. आपल्यासाठी असतात आश्वासन आणि फक्त आश्वासन. का तर आपल्या मतांशी त्यांना काम असत मत मिळाल काम झाल पुढच्या मतदानापर्यंत त्यांना मग आपल्याशी काहीच घेण देण नसत. आपण मात्र आपल माणूस समजून त्यांना मतदान केलेलं असत त्याचा काहीच फायदा होत नाही. मग काय कराव...सत्ता हवीच . कारण जस सगळ्याचा अविर्भाव आणता येतो पण पैश्याचा नाही तसेच संघटीत पण टिकवायचा असेल या जगात तर सत्तेचा नुसता अविर्भाव दाखवता येत नाही. ती असावी लागते. मगच पाठबळ मिळते.

आपल्याकडे विविध पक्ष आहेत. त्यांची विविध धोरणे आहेत आणि ती संधीनुसार बदलतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण जेंव्हा आपण आपल्या समाज्याला सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायचा विचार करतो तेंव्हा आपण राजकीय बनायला हव याच महत्व कळत. कारण नुसते राजकीय पुढारी जरी ते कितीही मोठ्या पदावरचे असतील तरी आपल्याला पाठींबा दाखविला तरी जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेंव्हा ते पुढारी त्याचं राजकीय बळ त्यांच्या समाज्याच्या पाठी लावतात किंव्हा जिथे जास्त फायद आहे तिथे जातात. आणि प्रत्येक वेळी आपण म्हणत बसतो कि 'आपल कोण तरी पाहिजे होत रे'.

आपल्याकडे पण आपली माणसं विविध पक्षात आहेत. काही ठिकाणी ते यशस्वी हि आहेत. आपण सगळ्यात मोठी समस्या माज्या मते आहे ती अशी 'आपणाकडे कोणत्याही पक्षात मोठ पद नाही आहे. इतरांप्रमाणे आपल्या सामाज्याचा दबावगट नाही आहे, जेणेकरून जरी पद नसले तरी सोयी सुविधा घेता येतील. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दुफळी एकतर आपण सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी आपल्याच माणसांबरोबर (जी दुसर्‍या पक्षात असतात) भांडतो आणि सत्ता तिसराच घेऊन जातो. नाहीतर वरिष्ठ पदावरील लोक आपल्यातच भांडण लाऊन आपली शक्ती कमी करतात.' शेवटी आपण आपल्याच माणसांना दोष देऊन मन दुषित करून ठेवतो. आपली माणस आपल्या कामाची नाहीत...

आता वेळ आली आहे.
विचार करण्याची...विचार बदलण्याची...

  1. कुठला पण पक्ष किंवा व्यासपीठ असू द्या. जर आपली माणस असतील तर सहकार्य करा. संघटितपणे त्यांना पाठींबा द्या. काही झाल तर आपली माणसे आपली असतात.
  2. अशी पण वेळ येऊ शकते कि जिथे एका वेळी आपलीच माणसे आपल्या माणसांविरुद्ध उभी असतील तेंव्हा समेट घडवण्याचा प्रयत्न करा. कारण प्रतिनिधी जेंव्हा एक असतो तेंव्हा एकीच बळ सगळ्यात प्रभावी ठरत आणि जरी कमी लोकसंख्येमुळे सत्ता आली नाही तरी दबावगट निर्माण होऊन फायदे उपभोगता येऊ शकतात.
  3. प्रत्येक पक्षात आपला माणूस असावा. जेणेकरून सत्ता कोणाची का असेना आपली माणस तिथे आपल्यासाठी दाद मागू शकतील.
  4. सत्तेत असलेला पक्ष त्यांच्या प्रतिनिधीच गार्हाण ऐकतो. पण आपला पक्ष सत्तेत असला तरी इतर पक्षातील आपल्या माणसांच्या व्यथा सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा.
  5. जरी विविध गटात असले तरी वेळप्रसंगी एकजूट दाखवून क्रमाक्रमाने सत्तेत सामील व्हा. जेणेकरून सगळ्यांना संधी मिळेल. तसेच सत्तेत कोणीही असो त्याने आपल्या माणसांना मदत केलीच पाहिजे.
  6. सर्वात महत्वाच म्हणजे जेंव्हा जेंव्हा निवडणुका येतील तेंव्हा तेंव्हा त्या क्षेत्रातील जमेल त्या सगळ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रचाराला हातभार लावावा. (उमेदवार निष्कलंक, प्रामाणिक आणि सामाज्यासाठी झटणारा असावा हे सांगायला नकोच!) आणि निवडणूक झाल्यावरही उमेदवारांवर बारीक नजर असावी. शेवटी आपल्या माणसांची माहिती आपल्याला माहीत असावी.

म्हणून...


आपल्या विभागातून जर कोणी लोणारी समाजातील व्यक्ती उमेदवार म्हणून निवडणीकीसाठी उभे असतील तर त्यांच्याकडे पक्ष म्हणून न बघता लोणारी समाजातील एक व्यक्ती व एकमेकांमधले मतभेद विसरून आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपले अमूल्य मत देऊन प्रचंड मतांनी निवडून आणा.

एकच लक्ष्यात ठेवा "आपल्यासाठी आपली माणसे"

- दीपक भोजा काळेल, मुंबई
Partner With: www.dhruvansh.com / www.chitrakarmi.com