लोणारी समाजाला तंत्रज्ञानाच्या पंखांची भरारी
जयंत लंगडे - सकाळ वृत्तसेवा / शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२ / सातारा आवृत्ती
माळरानावरून चुनखडी गोळा करून त्यापासून बांधकामाचा चुना तयार करणारा आणि जळाऊ कोळशाच्या भट्ट्या लावून उदरनिर्वाह करत प्रतिकूल परिस्थितीत झगडणाऱ्या लोणारी समाजातील युवकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास घेतला असून, "लोणारी डॉट कॉम' संकेतस्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे पंख धारण केले आहेत. गुणवंत समाजबांधवांचे कोडकौतुक, विवाहनिश्चिती करण्यासाठीही हे आधुनिक तंत्र वापरून लोणारी युवक नवभरारी घेताना दिसत आहेत.
या नवभरारीविषयी या समाजाचे नेते प्रा. चंद्रकांत गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 50 वर्षांपूर्वी समाजबांधवांशी संवाद साधावयाची माध्यमे फारशी उपलब्ध नव्हती. वृत्तपत्रातून थोडीफार समाजासंबंधी माहिती मिळत असे; पण ती फारच त्रोटक स्वरूपात असायची. मेळावे, अधिवेशने आणि पत्रके काढूनच परस्परांशी संवाद साधला जायचा. समाजाचे नेते पितामह विष्णुपंत दादरे यांनी मुंबईत पत्रके काढली. पदरमोड करून कधी रेल्वेने, कधी एसटीने तर प्रसंगी पायीसुद्धा प्रवास करीत समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धांचे जंजाळ आणि गतानुगतिकतेच्या भावविश्वात गुरफटून गेलेल्या आणि शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या उभ्या महाराष्ट्रात विखुरलेल्या समाजबांधवांना एकत्रित करण्याचा त्यांनी पराकोटीचा प्रयत्न केला; पण त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आजही जाणवते. पर्यावरणाबाबत शासनाने बदलते धोरण आणि बांधकाम क्षेत्रातील सिमेंटच्या वाढलेल्या वापरामुळे लोणारी समाजाच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे.
वृत्तपत्रे, नियतकालिके, त्रैमासिके, दूरध्वनी, टीव्ही वाहिन्या, मोबाईल फोन व जलद वाहतुकीची साधने यामुळे समाज खूपच जवळ येत चालला आहे. त्यामुळे तरुणांची समाजाबद्दलची अनास्था कमी होऊन समाजोन्नतीच्या ध्यासाने प्रेरित झालेल्यांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगत होत चालल्याचे दिसत आहे. त्याच भावनेतून मार्च 2007 मध्ये समाजातील उत्साही, उच्चविद्याविभूषित आणि सळसळत्या रक्ताच्या काही युवकांनी एकत्रित येऊन www.lonari.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. नितीन काळेल (मुंबई), नितीन डांगल, विनोद आटपाडकर, तन्मय कानडे आणि विशाल काळेल या तरुणाईने त्यासाठी पुढाकार घेतला असून, त्या संकेतस्थळासाठीचा लागणारा दरमहाचा खर्चही तेच करत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सध्याच्या धकाधकीच्या युगातही ही सामाजिक कृतज्ञतेची जाणीव दुर्मिळच म्हणावी लागेल. सुरवातीच्या काळात संकेतस्थळ सुरू करण्यासाठीचा दहा ते बारा हजार रुपये भागभांडवलाची उभारणीही त्यांनी पदरमोड करूनच केली होती. त्या माध्यमातून एसएमएसद्वारे समाजबांधवांशी संपर्क साधला जातो. हा संपर्क केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजराथ, आंध्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही समाजबांधवांशी या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. या संकेतस्थळावरून महिन्याला साधारण 15 हजारांहून अधिक एसएमएस पाठविले जातात. आजअखेर या संकेतस्थळावरून 12 लाखांहून अधिक एसएमएस राज्य व परराज्यातील समाजबांधवांना पाठविले जात आहेत.
समाजातील विविध क्षेत्रांतील गुणवंतांचे कोडकौतुक, झाडे लावण्याच्या संदेशातून पर्यावरणविषयक जनजागृती, कुटुंबनियोजन व आरोग्यविषयक मार्गदर्शनपर माहितीही "एसएमएस'द्वारे दिली जाते. याशिवाय "लोणारी डॉट कॉम' या संकेतस्थळावर समाजातील असंख्य उपवर वधू- वरांचा वय, उंची, शिक्षण, नोकरी/ व्यवसाय, फोटो आदी संपूर्ण परिचय उपलब्ध केला जात आहे. त्यातून वधू- वर व त्यांच्या पालकांचा मोबाईल, इंटरनेट आणि प्रत्यक्ष भेटून परिचय घडवून आणला जात आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होताना दिसत आहे. या अत्याधुनिक प्रभावी माध्यमामुळे अनेकांचे विवाह जुळून आल्याचे आणि ते सुखी संसार मार्गी लागले आहे.
परिस्थितीशी टक्कर देत यशाची शिखरे पादाक्रांत केलेल्यांची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समाजातील कोणी युवक महसूल किंवा विक्रीकर अधिकारी आहे, कोण आरटीओ, फौजदार किंवा दूधसंघाचा अध्यक्ष झाला आहे. कोण समाजसेवक दलितमित्र पुरस्काराने सन्मानित झाला, यासारख्या भूषणावह व्यक्तिमत्त्वांचा परिचय या संकेतस्थळावर मिळत असून, अशा 75 समाजभूषणांची यादीही तेथे झळकविण्यात आल्याने समाजबांधवांतून आनंद व्यक्त होत आहे.
दोन हजारांहून अधिक सभासद
संकेतस्थळावरून समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शासकीय, निमशासकीय स्तरातील नोकरी व रोजगारसंधीची माहितीही उपलब्ध करून दिली जाते. सध्या या संकेतस्थळाचे दोन हजारांहून अधिक सभासद असून, ते त्याचा नियमितपणे वापर करून परस्परांशी "कनेक्टिव्हिटी'मध्ये आहेत.
- प्रा. चंद्रकांत गीते (सातारा)